आज दिनांक 22/12/2025 रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद सिंधुदुर्ग श्री. रवींद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली जन्म-मृत्यू नोंदणी जिल्हास्तरीय समन्वय समितीची आढावा बैठक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे घेण्यात आली. या बैठकीत केंद्र शासनाच्या सीआरएस पोर्टलवर १०० टक्के जन्म-मृत्यू नोंदणी करणे, अवैध जन्म आणि मृत्यू नोंदणी रद्द करणे तसेच १६ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ सुधारित २०२३ मधील कलम ८ व ९ नुसार २१ दिवसांच्या आत जन्म-मृत्यू नोंदणी करणे आवश्यकअसून सीआरएस पोर्टलवर शंभर टक्के नोंदणी करूनच प्रमाणपत्र वितरित कार