अमरावती: ऑनलाइन फसवणुकीतील ₹24 लाखांची रक्कम फिर्यादीला परत, अमरावती सायबर पोलिसांची मोठी कारवाई
अमरावती शहर सायबर पोलिसांची यशस्वी कार्यवाही! अमरावती शहर सायबर पोलिसांनी ऑनलाइन फसवणुकीतील ₹24 लाखांची रक्कम फिर्यादीला परत मिळवून दिली! फसवणूक करणाऱ्यांनी “Digital Arrest” च्या नावाखाली वृद्ध वकिलाची ₹31.5 लाखांची फसवणूक केली होती. तांत्रिक तपासातून ICICI बँकेत गोठवलेली रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार परत मिळवण्यात पोलिसांना यश आले.