🚦 आषाढी एकादशी, नंदवाळ – वाहतूक मार्गात तात्पुरते बदल 🚦
आषाढी एकादशी निमित्त नंदवाळ येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने वाहतूक सुरळीत राहावी व नागरिकांची गैरसोय टाळावी यासाठी इचलकरंजी पोलीस ठाणे, कोल्हापूर यांच्या वतीने विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
🛣️ कृपया या पोस्टमधील वाहतूक व पार्किंग नकाशा पाहूनच प्रवासाचे नियोजन करा.
🚗 पर्यायी मार्गांचा वापर करा.
🅿️ वाहन फक्त निर्धारित पार्किंग ठिकाणीच उभे करा.
👮 वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करा.
सुरक्षित प्रवास करा, नियम पाळा आणि सहकार्य करा.
#KolhapurPolice #TrafficUpdate #AshadhiEkadashi #Nandwal #TrafficAdvisory #RoadSafety #Kolhapur
Kolhapur, Maharashtra | Jul 29, 2026