बिलासपूर रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रीवरून वेंडर्सच्या दोन गटांत हाणामारी; तिघांना अटक
छत्तीसगडमधील बिलासपूर रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रीच्या वादातून वेंडर्सच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर सुरू झालेला वाद प्लॅटफॉर्म क्रमांक २ पर्यंत पोहोचला. यावेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ आणि घबराट निर्माण झाली. घटनेच्या वेळी प्लॅटफॉर्मवर पटना-चरळपल्ली एक्स्प्रेस उभी होती. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन्ही गटांनी रेल्वे पोलीस (GRP) ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी तीन वेंडर्सना अटक केली आहे. या घटनेनंतर रेल्वे स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
#Bilaspur #ChhattisgarhNews #RailwayStation #ViralVideo #CrimeNews
Pune City, Pune | Oct 17, 2026