पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, श्री. चंद्र किशोर मीना (भा.पो.से.) यांच्या हस्ते २४ तास सागरी सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलासोबत विविध ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना पावसाळी हंगामात प्रतिकूल हवामानातही सुरक्षितपणे व कार्यक्षमतेने सेवा बजावता यावी, या उद्देशाने रेनकोटचे वाटप करण्यात आले.
यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी , पोलीस अधिकारी, होमगार्ड अधिकारी व होमगार्ड जवान उपस्थित होते. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #RatnagiriPolice
24 views | Ratnagiri, Maharashtra | Aug 3, 2026