अमरावती: अमरावती महापालिका क्षेत्रात मालमत्तेच्या क्षेत्रफळ आधारित कर आकारणीचा निर्णय, आ.सुलभा खोडके यांच्या प्रयत्नांना यश
अमरावती शहरांमध्ये भाडे कराराने दिलेल्या इमारतींना महानगरपालिकेतर्फे प्रत्यक्ष भाड्यावर कर आकारणी करण्यात येत होती. महापालिकेच्यावतीने कर आकारणी पद्धतीमध्ये सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता शहरात मालमत्तेच्या क्षेत्रफळ आधारित कर आकारणी करण्यात येणार असल्याने कमर्शियल टॅक्सधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबद्दल आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे व मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.