भोकरदन: छत्रपती चौक भोकरदन व परिसरात अवकाळी पाऊस
आज दिनांक 30 मार्च 2026 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच भोकरदन शहर व परिसरात जोरदार वादळीवाल्यासह अवकाळी पाऊस झाला आहे, या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शहरातील पायी जाणाऱ्या नागरिकांची व व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली असून त्यांना आसरा घ्यावा लागला आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार हा पाऊस झाला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन सुद्धा हवामान खात्याने केले आहे.