भाजप आमदारांचा सरकारवर विश्वास नाही: आमदार रईस शेख
आज दिनांक 17 मार्च 2025 वेळ दुपारी दोन वाजून 40 मिनिटाला विधान भवन परिसर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आपली प्रतिक्रिया दिली यावेळी आ.शेख म्हणाले भाजपचे आमदार अतुल भातखळकर व आ .सुधीर मुनगंटीवार यांनी लव जिहादवर खाजगी बिल आणल आहे भाजपला खुश करण्यासाठीच हे सदस्य असा प्रकार करत आहेत सरकारकडे लव जिहाची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नसल्याची माहिती सरकारकडून पुढे येत आहे हे सदस्य खाजगी बिल आणून सरकारवरच आपला विश्वास नसल्याचे दाखवत आहेत असे आ. शेख म्हणाले.