सीएसटीएम स्थानकावर शिवजयंतीचा उत्सव
आज दिनांक 17 मार्च 2025 वेळ सकाळी अकरा वाजून 40 मिनिटाला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जात आहे. आज मुंबईमध्ये सर्वत्र तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर भारतीय रेल कामगार सेने कडूनही शिवजयंती साजरी केली जात असून या ठिकाणी लेझीम पथक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. यावेळी शिवरायांच्या घोषणांनी स्थानक परिसर दणाणून सोडला आहे.