#खोट्या सोन्याचे बिस्कीट देऊन वृद्धेचे दागिने लुटणारा आरोपी जेरबंद; ४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या वृद्ध महिलेला खोट्या सोन्याचे बिस्कीट देऊन तिचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या प्रकरणात ऋषीकेश बंडू जाधव (रा. बीड) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा ४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तुळजापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. आरोपीने चौकशीत अन्य साथीदारांची नावेही सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
#dharashiv #CrimeNews #paranda #NewsUpdate #Update
Dharashiv, Dharavshiv | Sep 6, 2026