पेण: स्मार्ट मीटरमुळे वीजबिलांचा शॉक; नागरीकांत संतापाची लाट
Pen, Raigad | May 31, 2026 महागाईच्या झळांनी आधीच होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांना वीजबिलाच्या वाढत्या आकड्यांनी अक्षरशः हादरवून सोडले आहे. घरातील वीज वापर पूर्वीइतकाच असतानाही हजारो रुपयांचे वाढीव बिल हातात पडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरणकडून "स्मार्ट मीटर अधिक अचूक आहेत" असा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात सामान्य ग्राहकांना या बदलाचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र समोर येत आहे.