सेलू: सांडपाणी नळाद्वारे घराघरात; पाणीपुरवठा योजनेचा फज्जा, सेलूकरांना महिनाभरापासून दूषित, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा
शहरातील नागरिकांना महिनाभरापासून नळांमधून सांडपाण्याच्या नालीतून येणारे दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा आरोप नगरपंचायतीवर होत आहे. प्रभाग क्र.१२ सह शहरातील अनेक भागांत हीच भीषण परिस्थिती असून, प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचे दिसत आहे. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, उलट्या-जुलाब, ताप आदी आजारांचा धोका वाढला असतांनाही अद्याप ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांनी ता. २२ गुरुवारी सकाळी ११.३० वाजता नगरपंचायत जाऊन संताप व्यक्त केला.