पेण: उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीत दिलजमाई, जुईली दळवी अर्ज मागे घेणार
Pen, Raigad | Jun 2, 2026 रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या जागावाटपाचा आणि स्थानिक नेतृत्वाचा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत आज दिलजमाई झाली असून, रायगड पालकमंत्रीपद शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे तर विधान परिषदेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांना असा सामोपचाराचा फॉर्म्युला ठरला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांची देखील उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चर्चा झाली. त्यानंतरच फॉर्मूला ठरला.