न्यायालयीन कामकाजाचा प्रभावी समन्वय, दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यावर भर!
मा. विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या सूचनेनुसार पोलीस दलांतर्गत सर्व पोलीस ठाण्यांतील कोर्ट मोहर्रर व पैरवी अधिकारी यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक मा. राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नागपूर शहर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. यावेळी मा. महक स्वामी, पोलीस उपायुक्त, सायबर, नागपूर शहर यांचीही उपस्थिती होती.
सदर बैठकीमध्ये न्यायालयीन प्रकरणांचा प्रभावी पाठपुरावा, प्रलंबित खटल्यांचा आढावा, साक्षीदारांची उपस्थिती, पुराव्यांचे योग्य सादरीकरण तसेच दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
न्यायदान प्रक्रियेत पोलीस विभागाची भूमिका अधिक सक्षम व परिणामकारक करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व अंमलदारांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
#NagpurCityPolice #JusticeDelivery #ConvictionRate #PoliceAdministration #NagpurPolice #LawAndOrder
Nagpur, Maharashtra | Nov 9, 2026