जाफराबाद: छत्रपती शिवाजी महाराज चौकात महामंडळाच्या बस वर डॉ.बाबासाहेबांचा फोटो लावत ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली मिरवणूक
आज दिनांक 14 एप्रिल 2026वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक परिसरामध्ये परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आगळीवेगळी जयंती साजरी करण्यात आल्याचे पाहायला मिळाली आहे याप्रसंगी एस टी महामंडळाच्या बसेसच्या समोरील काचेला व संपूर्ण बसेस नटवत काचेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांचा फोटो लावत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.