लातूर: लातूरमध्ये तलवारीने एकावर जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लातूर -लातूर शहरात दिवसेंदिवस धारदार शस्त्रांची दहशत वाढत चालली आहे. शहरात कोयता आणि तलवारीच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने होताना दिसत आहेत, दोन दिवसांपूर्वीच एका तरुणावर दोन ते तीन तरुणांनी कोयताने हल्ला केल्याची घटना घडली होती. दरम्यान त्यानंतर आज लातूर शहरातल्या नाईक चौक परिसरात रात्री तीन ते चार तरुणांनी एकावर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.