अलिबाग: रायगड जिल्ह्यात १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत; नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आवाहन
Alibag, Raigad | Aug 30, 2026 महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्री एस. बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबागच्या सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश रेवती कंटे यांनी केले आहे.