सावनेर: डिफेन्स न्यूक्लियर कॉरिडॉरला माळेगाव व जूगा ग्रामसभेचा विरोध
Savner, Nagpur | Aug 1, 2026 सावनेर परिसरात प्रस्तावित डिफेन्स न्यूक्लिअर कॉरिडॉर प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या विरोधात प्रकल्प पाणी शेतकऱ्यांनी तीव्र भूमिका घेतली आहे आज माळेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रकल्पासाठी एक इंचही जमीन देणार नाही असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या शेती उपजीविका आणि भविष्यासाठी जमीन अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन करण्या स्पष्ट विरोध दर्शविला