वाशिम: वाशिमसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शनिवारी पुनः अवकाळी पावसानं झोडपलं
Washim, Washim | Nov 1, 2025 वाशिम ला आज पुनः अवकाळी पावसानं झोडपलं... वाशिम सह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आज सायंकाळ दरम्यान अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे.वाशिम जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्यानं याचा फटका तूर,कपाशीला मोठ्या प्रमाणात बसला आहे.हाता तोंडाशी आलेल्या कपाशीला पुनः अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे.वाशिम जिल्ह्यात पुढील काही दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.