🎨 अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान | चित्रकला स्पर्धा 🚫
वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथे आयोजित "व्यसन सोडा, भविष्य घडवा" या विषयावरील चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
🖌️ एकूण ९८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून व्यसनमुक्त समाजाचा प्रभावी संदेश आपल्या कलाकृतींमधून मांडला.
👮♂️ श्री. निकेश खाटमोडे पाटील (IPS), पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले व व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी युवकांची भूमिका अधोरेखित केली.
🏆 यावेळी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
🤝 चला, एकत्र येऊन व्यसनमुक्त वाशिम – सुरक्षित, निरोगी आणि सशक्त भविष्य घडवूया.
#washimpolice #washim #drugfreewashim #saynotodrugs