पोलादपूर: वारली कलेने खुलला कशेडी बोगदा
कशेडी घाटातील धोकादायक व वेड्यावाकड्या वळणांमुळे प्रवाशांसाठी त्रासदायक ठरणारा प्रवास आता बोगद्यामुळे अधिक सुलभ आणि वेगवान झाला आहे. मात्र, हा प्रवास केवळ सोयीस्करच नव्हे तर संस्मरणीयही व्हावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने करोडी बोगद्याच्या प्रवेश आणि निर्गमन मार्गावर आकर्षक वारली पेंटिंग साकारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या चित्रकलेमुळे बोगद्याच्या सौंदर्यात मोठी भर पडली असून, महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांचे आणि वाहनचालकांचे विशेष लक्ष वेधले जात आहे.