पारशिवनीत राष्ट्रीय जंतनाशक मोहीम यशस्वी!
३५ हजारांहून अधिक बालकांना जंतनाशक औषध देण्याचे उद्दिष्ट; ३३० पथकांचा सहभाग
पारशिवनीत राष्ट्रीय जंतनाशक मोहीम यशस्वी! ३५ हजारांहून अधिक बालकांना जंतनाशक औषध देण्याचे उद्दिष्ट; ३३० पथकांचा सहभाग .बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांचे पोषण सुधारावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पारशिवनी तालुक्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील एकूण ३५ हजार १४ लाभार्थ्यांना जंतनाशक औषध (अल्बेंडाझोल) देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.३३० पथकांच्या माध्यमातून मोहीम मोहिम राबवण्यात आले. राष्ट्रीय जंतनाशक मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने व्यापक नियोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २४ आरोग्य उपकेंद्रे, १ ॲलो