हिंगणा: वनाडोंगरी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यक्रम पडला पार
Hingna, Nagpur | Apr 8, 2026 भारतीय जनता पार्टी, हिंगणा विधानसभा तर्फे "पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ " कार्यक्रम YCCE कॉलेज मधील श्री. दत्ता मेघे ऑडिटोरियम, वानाडोंगरी येथे पार पडला. या प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष श्री. मनोहरराव कुंभारे यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव जी पोतदार, प्रा. गिरीशजी देशमुख, पालकमंत्री कार्यालयातील पक्षाचे समन्वयक किशोर जी रेवतकर, जिल्हा महामंत्री श्री. दिनेश ठाकरे, आदी उपस्थित होते.