करवीर: श्री अंबाबाई मंदिर संवर्धनावरील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
करवीर येथील श्री अंबाबाई मंदिराच्या जतन कामातील आरोपांवर आधारित जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळून लावली आहे. ही याचिका हिंदू जनसंघर्ष समितीचे अभिजित पाटील यांनी दाखल केली होती.