🚔 स्वप्नांना बळ, मेहनतीला दिशा… पोलीस भरतीची नवी आशा! 🇮🇳
जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पाळधी येथे आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरात शेकडो भावी पोलीस उमेदवारांना मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, शारीरिक तंदुरुस्ती आणि भरती प्रक्रियेबाबत तज्ज्ञांकडून मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ११ सौरऊर्जेवर चालणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अनावरणही करण्यात आले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला हा उपक्रम ग्रामीण भागातील युवक-युवतींच्या पोलीस दलात भरती होण्याच्या स्वप्नांना नवी दिशा आणि प्रेरणा देणारा ठरला!
स्वप्न खाकी वर्दीचे… ध्यास देशसेवेचा! 🇮🇳
जळगाव पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर!
#JalgaonPolice #PoliceRecruitment #PoliceBharati #PoliceTraining #Jalgaon #GulabraoPatil #ShrikantDhivare #जळगावपोलीस #पोलीसभरती #देशसेवा
Jalgaon, Maharashtra | Oct 30, 2026