श्रीवर्धन: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची दगडाने ठेचून हत्त्या करण्याची घटना बुधवारी दुपारी दिघी येथे घडली आहे. या घटनेत पत्नी अनिता वाघमारे या वीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून पती किरण वाघमारे याला अटक करण्यात आली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावाच्या हद्दीमध्ये नवगरे जंगल भागात आंबा बागायतीमध्ये राखणदार म्हणून काम करणाऱ्या विवाहित जोडप्यामध्ये नेहमीच वाद होत होते. पती आरोपी हा चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीला मारहाण करीत होता.