सेलू: बाजार समितीच्या सेलू येथील उपबाजारपेठेत गुरुवारी लिलावपद्धतीने कापूस खरेदीचा शुभारंभ
Seloo, Wardha | Nov 13, 2024 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू येथील उपबाजारपेठेत बाजार समितीच्या आवारात उघड पद्धतीने या हंगामातील कापूस खरेदीचा श्रीगणेशा ता. १४ नोव्हेंबर गुरुवाराला दुपारी १२.३० वाजता बाजार समितीचे सभापती केसरिचंद खंगारे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कापूस उत्पादक शेतकरी, वाहन चालक आणि व्यापाऱ्यांनी याप्रसंगी उपस्थित राहावे. असे आव्हाहन सचिव महेंद्र भांडारकर यांनी आज ता. १३ बुधवारला सकाळी ११ वाजता प्रसिद्धी पत्रकातून केले.