जाफराबाद: अंधेरी येथे शेती ताबा घेण्याच्या कारणावरून शेतकरी परिवाराच्या घरावर टोळक्याने केली दगडफेक ,व्हिडिओ समोर
आज दिनांक 30 जून 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील अंधेरी येथे काल दिनांक 29 जून 2026 रोजी दुपारच्या सुमारास अंधेरी येथील शेतकरी सतीश हाके यांच्या शेतात असलेल्या घरावर काही अज्ञात 50 ते 60 जणांच्या टोलक्यांनी दगडफेक करत शेती ताबा घेतला आहे, यामध्ये त्यांनी जाफराबाद पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांची व महसूल विभागाची भूमिका यामध्ये संशयस्पद असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे.