सोन्याची चेन चोरल्याचा संशयावरून दोघांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. ही घटना रात्री खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली. काशिनाथ रंगनाथ भक्त (२५, निघोजे, खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दर्शन लक्ष्मण शिंदे, चैतन्य ज्ञानेश्वर येळवंडे (रा. निघोजे, खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे