जाफराबाद: छत्रपती शिवाजी महाराज चौकात हनुमान मंदिरात भाजपा कार्यकर्त्यांनी केली महाआरती
आज दिनांक 10 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत हनुमान मंदिरामध्ये महाआरती केली आहे ,याचे कारण म्हणजे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे सरकार यायला 12वर्षे पूर्ण झाले आहे, या बारा वर्षात देश हिताचे बरेच कामे व निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारने घेतल्याबद्दल महाआरती आज भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.