लालपरी’च्या प्रश्नांकडे बाप्पाच्या सजावटीतून लक्ष; एकदंता टीमचा अनोखा सामाजिक संदेश!
स्वच्छ बसस्थानकं, प्रसाधनगृहं, कॅन्टीन, चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृह आणि सुरक्षित बससेवेची अपेक्षा; ७ दिवसांत साकारला ६ फूटांचा देखावा
डोंबिवली : गणेशोत्सवाच्या सजावटीतून दरवर्षी एका महत्त्वाच्या सामाजिक विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकदंता टीम, डोंबिवलीने यंदा महाराष्ट्राच्या जनजीवनाशी घट्ट जोडलेल्या एस.टी.च्या ‘लालपरी’चा विषय आपल्या गणेश सजावटीतून मांडला आहे.
गावागावातून लाखो प्रवाशांना जोडणाऱ्या एस.टी. बससेवेसाठी स्वच्छ बसस्थानकं, स्वच्छ प्रसाधनगृहं, योग्य कॅन्टीन, चालक-वाहकांसाठी विश्रांतीची सुविधा, सुरक्षित व सुस्थितीत बससेवा तसेच प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा या देखाव्यातून व्यक्त करण्यात आली आहे.
“एस.टी. ही फक्त बस नाही, तर महाराष्ट्राच्या जनजीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे
Kalyan, Thane | Sep 16, 2026