पनवेल: सुकापुर येथील सागर पॅलेस स्टॉक अप वाईन येथे लागली मोठी आग
Panvel, Raigad | Nov 5, 2025 सुकापूर येथील सागर पॅलेस स्टॉक अप वाईन शॉप दुकानाला आज बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी मोठी आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेतल्यामुळे या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि मोठी जीवित व वित्तहानी टळली. प्राथमिक माहितीनुसार शॉप मधल्या फ्रिजला आग लागली त्यामुळे शॉर्टसर्किट घडली असावी.