कर्जत: तीन लाखांची रक्कम घेतल्याचा तरूणीचा आरोप; गुन्हा दाखल
Karjat, Raigad | Jun 29, 2026 लग्नाचे आश्वासन देत प्रेमसंबंध प्रस्थापित करून एका तरुणीकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन नंतर विवाहास नकार देत आर्थिक फसवणूक केल्याची घटना कर्जत तालुक्यातील गुंडगे येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि गुंडगे येथील आरोपी यांच्यात काही काळापासून प्रेमसंबंध होते. दागिने व रोख रक्कम मिळाल्यानंतर आरोपीने विवाह करण्यास नकार दिला. तसेच, घेतलेले दागिने आणि पैसे परत करण्याची वारंवार मागणी करूनही त्याने टाळाटाळ केल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.