शहादा: शहरातील विविध प्रभागांमध्ये जीर्ण विद्युत तार व पोल बदलण्याची विद्युत वितरण कंपनीकडे जितेंद्र जमदाडे यांची मागणी
शहादा शहरातील विविध प्रभागांमध्ये जीर्ण तारा व पोल बदलण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जमदाडे यांच्या नागरीकांनी प्रकाशा रस्त्यावर असलेल्या विद्युत वितरण कार्यालयात अभियंता अनिल तटकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जीर्ण तारा व पोलमुळे जीवीतहानी होण्याची शक्यता असून विद्युत वितरण कंपनीने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतांना जितेंद्र जमदाडे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.