शहादा: खेडदिगर तपासणी नाक्यावर म्हसावद पोलिसांकडून वाहनांची तपासणी
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी म्हणून कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. शहादा तालुक्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या खेडदिगर तपासणी नाक्यावर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आले असून वाहनांची तपासणी केली जात आहे.