पाच महिन्यांपासून बेपत्ता गँगस्टरचा खळबळजनक शेवट..! ड्रेनेज चेंबरमध्ये सापडला सांगाडा...
नालासोपारा पूर्वेतील वैतिवाडी परिसरात पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या कुख्यात गँगस्टर रवि बिडलान प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे.
ड्रेनेज चेंबरमधून सापडलेला मानवी सांगाडा हा रवि बिडलान याचाच असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या प्रकरणात कट रचून खून आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप पाच जणांवर ठेवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका दारू पार्टीदरम्यान झालेल्या चर्चेतून या हत्याकांडाचा सुगावा पोलिसांना लागला. त्यानंतर तपासाची दिशा बदलत पोलिसांनी संशयितांवर लक्ष केंद्रित केले. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, इतर संशयितांची चौकशी सुरू आहे.
तपासादरम्यान ड्रेनेज चेंबरमधून मानवी सांगाडा आणि कपड्यांचे अवशेष जप्त करण्यात आले. फाटलेल्या कपड्यांची ओळख रवि बिडलान यांच्या पत्नीने पटवून दिली असून, डीएनए अहवालाची प्रतीक्षा आहे.
या प्रकरणाबाबत नालासोपारा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांनी माहिती दिली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, हत्येमागील संपूर्ण कट उघड करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
📍 धीरज घोलप
महाव्हाईस न्यूज, मुंबई
#CrimeNews #GangsterCase #Nalasopara #PoliceInvestigation #MumbaiNews #MaharashtraNews #ViralNews #LatestUpdate #IndiaNews