दिल्लीतील शाळेत हृदयद्रावक घटना! खेळून आल्यानंतर तिसरीतील विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू
दिल्लीतील मयूर विहार येथील लव्हली पब्लिक स्कूलमध्ये ४ नोव्हेंबर रोजी तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाला. खेळून आल्यानंतर ती दोन मिनिटे उभी राहिली आणि अचानक कोसळली. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्राथमिक अंदाज हृदयविकाराच्या झटक्याचा असला तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी प्राथमिक उपचार, CPR आणि रुग्णालयात नेण्यास झालेल्या विलंबाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
#DelhiNews #MayurVihar #LovelyPublicSchool #SchoolNews #StudentDeath #HeartAttack