शहरातील गजबजलेल्या सक्करदरा चौकातील बुधवारी बाजार परिसरात २० फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही आग लागली असून, यात बाजारपेठेतील माल जळून खाक झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे जेव्हा संपूर्ण परिसर गाढ झोपेत होता, तेव्हा बुधवारी बाजार परिसरातील काही दुकानांतून अचानक धूर निघू लागला. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले हे काही थरारक व्हिडिओ देखील समोर आले आहे.अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.