धुळे: नेर गावातील भदाणे शिवारात विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू, धुळे तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
Dhule, Dhule | Sep 4, 2024 नेर गावातील भदाणे शिवारात विहिरीत पडल्याने एका 21 वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. समाधान रावण पारधी जुने भदाणे असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी तत्काळ उपाययोजना करून समाधानला विहिरीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने धुळे शहरातील सिविल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरुण कुमार नागे यांनी तपासल्यानंतर समाधान पारधीला मृत घोषीत केले.