धुळे: वाढदिवसात तलवारी घेऊन नाचणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शंभर फुटी रोड परिसरातून घेतले ताब्यात
Dhule, Dhule | Sep 4, 2024 वाढदिवस साजरा करताना हातात तलवार घेऊन नाचणं दोघा तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. वाढदिवस साजरा करताना हातात तलवार घेऊन नाचणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून चार तलवारी आणि एक चॉपर जप्त केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये हे दोघे तरुण तलवारी घेऊन नाचत असल्याचे दिसून आले. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी या तरुणांचा शोध सुरू केला आणि शेवटी त्यांना शंभर फुटी रोड परिसरात असलेल्या सुमय्या हॉल जवळून अटक केली.