धुळे: धुळे शहरातील नागरी वसाहतींची पावसाच्या पाण्यामुळे होणारी तारांबळ थांबणार, आमदार फारुक शहा यांची माहिती
Dhule, Dhule | Sep 4, 2024 धुळे शहरात रहिवाशी भाग विकसित होत असतांना विकासकांनी नैसर्गिक पाण्याचे बहाव तथा नाले बंद करून टाकल्यामुळे पावसाचे पाणी तुंबून घरात घुसते नागरिकांचे परिणामी नुकसान होते. दरवर्षी येणारी ओरड लक्षात घेवून आ.फारुख शाह यांनी मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेवून शहराची विदारक परिस्थिती लक्षात आणून दिली. एकूण परिस्थितीचे गांभीर्य पाहून मंत्री अनिल पाटील यांनी अशी स्थिती धुळे शहराची पुन्हा होवू नये म्हणून भरीव आर्थिक मदत देण्याचे आश्वासित केले.