शनिवारी नवोदयचे पेपर होते.या पेपरसाठी विद्यार्थी सकाळीच प्रेक्षकेंद्रावर पोहचले मात्र यातील काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट असतानाही पेपरला बसता आले नाही.हा प्रकार वैजापूर शहरातील न्यू हायस्कूल येथील परीक्षा केंद्रावर घडला.सकाळी 8 वाजताच विद्यार्थी हे पालकांसह शहरातील न्यू हायस्कूल परीक्षा केंद्रावर पोहचले मात्र यातील 8 विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट मध्ये त्रुटी आढळून आली.