लासूर स्टेशन ते देवगाव रंगारी रोडवर समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरने पेट घेतल्याची घटना शुक्रवार दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली असून घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली असून अग्निशामक दलाला घटनेबाबत माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.दरम्यान घटनास्थळी आग आणि धुराचे लोट पसरले आहे.