सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी 21 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार डिजिटल अरेस्ट च्या नावावर फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना गुजरात येथून अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी दिली आहे.