सावनेर: सावनेर येथे भीम गीतांचा गजर, भीम योद्धा ग्रुप तर्फे महामानवाला स्वरांजली
Savner, Nagpur | Apr 18, 2026 सभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सध्या सावनेर शहरात चैतन्याचे वातावरण आहे. याच उत्साहाचे औचित्य साधून स्थानिक 'भीम योद्धा ग्रुप'च्या वतीने आयोजित भीमगीतांच्या भव्य कार्यक्रमाने अवघे शहर भीममय झाले असून, सुरांच्या माध्यमातून महामानवाला अभिवादन करण्यात आले.