जाफराबाद: माहोरा जाफराबाद मुख्य मार्गावर कोल्हापूर फाटा येथे नागरिकांनी केले रास्ता रोको आंदोलन
आज दिनांक 1जुलै 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद ता.कोल्हापूर फाटा येथे कोल्हापूरच्या शेकडो नागरिकांनी व महिलांनी हातात हांडे घेत रास्ता रोको आंदोलन केले आहे कारण शासनाच्या वतीने या गावाला जलजीवन योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे मात्र योजना अधुरीच राहिल्यामुळे गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे,काम तात्काळ पूर्ण करावे व ठेकेदारावर कारवाई करावी,कारण नागरिकांना पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत लागत आहे,त्यामुळे हे रास्ता रोको झाले.