शहादा: जावदे येथील 2 किलोमीटर अंतरावर सीमा तपासणी नाक्यावर लोकसभा निवडणुक निमित्त म्हसावद पोलिसांकडून वाहनांची तपासणी
शहादा तालुक्यातील जावदा येथील दोन किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमावर्ती नाक्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकार होऊ नये म्हणून म्हसावद पोलिसांकडून मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम करण्यात आली आहे सदर मोहीम ही म्हसावद पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किरण वळवी, भीमसिंग ठाकरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी केली.