रामटेक: रयतवाडी येथे मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या
Ramtek, Nagpur | Jun 29, 2026 पो.स्टे. देवलापार अंतर्गत येणाऱ्या रयतवाडी (वडांबा) येथील एका मानसिक आजाराने ग्रस्त मुलाने जन्मदात्या आईच्या डोक्यावर दगडाने वार करून तिची निर्घृण हत्या केली.ही हृदयद्रावक घटना रविवार दिनांक 28 जूनला सायंकाळी चार ते साडेचार वाजता च्या सुमारास रयतवाडी येथे घडली. किसणीबाई जोधराम इनवाते वय 50 वर्ष हे त्या दुर्दैवी मातेचे नाव आहे. तर कैलास जोधराम इनवाते वय 35 वर्ष असे त्या निर्दयी मुलाचे नाव आहे.