पोलादपूर: रेस्क्यू टीम सदस्यांना हवय आर्थिक पाठबळ
पोलादपूर ते महाबळेश्वर परिसरातील कोणतीही दुर्घटना, खोल दरीतील अपघात, हरवलेल्या व्यक्तींचा शोध किंवा नैसर्गिक आपत्तीची घटना घडली की सर्वप्रथम मदतीसाठी धावून येतात ते स्थानिक रेस्क्यू करणाऱ्या टीम या मध्ये, सह्याद्री, नरवीर, सिस्केप, मदत गृप सह महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम. आदी सह इतर जिल्ह्यातील टीम ला आधुनिक बचाव साहित्य सह आर्थिक मदतीची निकड भासत असल्याचे चित्र दिसून आले आहे.