पेण: नियमांचे पालन करून वाहने चालवली तर अपघात होणार नाहीत
Pen, Raigad | Apr 19, 2026 प्रत्येकाने नियमांचे पालन करून वाहने चालवली तर रस्त्यावर अपघात होणार नाहीत असे उद्गार पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नारकुल यांनी पेण तालुक्यातील जिते येथे रस्ता सुरक्षितता मोहिमेच्या समारोप प्रसंगी बोलताना काढले. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण यांच्यावतीने रस्ता सुरक्षितता अभियान समारोप व मान्यवरांचा सत्कार समारंभ जिते येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आला होता.